विजय खंडागळे याच कडून——
सोनई (प्रतिनिधी): विजय खंडागळे याच कडून येत्या नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिराजदार, पंचायत समितीचे बीडिओ संजय लखवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भाविकांच्या सोयीसाठी शनिशिंगणापूर परिसरात हेलिपॅड, भक्तनिवास, वाहनतळ, सलग्न रस्ते, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट, रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण आदी सुविधा उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. उद्या (शुक्रवार, ९ मे) शनिशिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बाळासाहेब बानकर व अध्यक्ष भागवत बानकर यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांची पाहणी बैठक होणार आहे.
या बैठकीत तयार करण्यात आलेला सुधारित आराखडा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. तसेच शिर्डीहून येणाऱ्या भाविकांसाठी बेल्हेंकरवाडी, केंदळ, आरडगाव मार्गे महामार्गाला जोडणाऱ्या १५ किमी रस्त्याचा प्रस्तावही तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.