अंकुश महाराज जगताप यांचे देवगड संस्थानला प्रथम निमंत्रण
नेवासा (वार्ताहर)
संतज्ञानेश्वरांच्या पावन भूमीवर पुन्हा एकदा अध्यात्माचा सोहळा उलगडणार आहे. पसायदान प्रतिष्ठानतर्फे येत्या ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगण, नेवासा येथे भव्य संगीतमय श्री हनुमान चरित्र कथा सादर होणार आहे.
ह.भ.प. अंकुशजी महाराज जगताप यांच्या सुमधुर वाणीमधून साकार होणाऱ्या या कथेमध्ये भक्ती, पराक्रम व श्रद्धेचा संगम अनुभवता येणार आहे. नेवासेकरांसाठी ही दिव्य अध्यात्मिक अनुभूती ठरणार असून, शहरातील नागरिक, महिला मंडळी व युवकवर्ग मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
या दिव्य सोहळ्याचे प्रथम निमंत्रण देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प.पू. प्रकाशानंदगिरीजी महाराज यांना देण्यात आले. स्वामीजींनी निमंत्रण स्वीकारून स्वतः उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी पसायदान प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व भाविक उपस्थित होत
भक्तांनी या भव्य आध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन हनुमंतभक्तीचा प्रसाद लाभावा, असे आवाहन आयोजक पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पारखे आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.

