नेवासा प्रतिनिधी
नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या यात्रा उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने झेंडा मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली. भगव्या टोप्या परिधान केलेल्या आणि आकर्षक पद्धतीने सजवलेला झेंडा हातात घेतलेल्या शहर व तालुक्यातील असंख्य भगवाधारी भाजपा कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
भाजप नेवासा मंडलप्रमुख मनोजआण्णा पारखे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मिरवणुकीस भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. बाळासाहेब कोलते, जिल्हा उपाध्यक्ष माऊली पेचे, जिल्हा उपाध्यक्ष व युवा नेते ऋषिकेश शेटे, धर्मरक्षक गणेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करत पुष्पवृष्टी केली.
यावेळी बोलताना मनोज पारखे, ऋषिकेश शेटे, डॉ. बाळासाहेब कोलते व माऊली पेचे यांनी सांगितले की, भगवा झेंडा हा क्रांतीचे व सनातन संस्कृतीचे प्रतीक असून तो पाहताच नवचैतन्य निर्माण होते. आम्ही धर्म व जातभेदाच्या पलीकडे जाऊन ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार काम करत असून, जागतिक नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाई कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या झेंडा मिरवणुकीत नगरसेवक निरंजन डहाळे, महेश लोखंडे, आदिनाथ पटारे, अशोक टेकणे, महेश नवले, निलेश लोखंडे, गोविंद कदम, शिवाजी लष्करे, अमोल पिटेकर, शुभम सपकाळ, राजेश कडु, प्रवीण दारुंटे, तेजस मन्नत, बंटी दिघे, देविदास साळुंके, नानासाहेब डौले, शंकर कणगरे, रोहित लष्करे, रोहित पवार, दिनेश गुंजाळ, रोहन कुसळकर, गणेश गाढवे, निरंजन वालतुरे, माऊली जाधव, विशाल धनगर, आदिनाथ निकम, प्रमोद घावटे, महेश भुसारे, नितीन शिंदे, सुशांत पारखे, महेश पारखे, बाबा कुसळकर, कुंडलिक आळकुटे, महेश आरले, शुभम बेहळे, यश कदम, विजय दहिवाळकर, रितेश कराळे, बाबा डुकरे, रमेश घोरपडे, बंडु वाघमारे, सुनिल हारदे, विलास बोरुडे, अनंता डहाळे, वैभव औटी, भारत चव्हाण, सागर चव्हाण, राम गडाख, संदीप पारखे, प्रताप कोंगे, महेश पवार, संतोष चांदणे, राहुल कुसळकर, श्रीराम लष्करे, गणेश लोखंडे, योगेश कोलते, अंबादास लोखंडे, सागर गंगुले आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरवणुकीनंतर भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब कोलते यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना अल्पोपहार देण्यात आला.
भाजपच्या वतीने श्री मोहिनीराज भगवान यात्रा उत्सवानिमित्त उत्साहात झेंडा मिरवणूक….
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
29.7
°
C
29.7
°
29.7
°
23 %
2.3kmh
0 %
Mon
30
°
Tue
38
°
Wed
39
°
Thu
40
°
Fri
40
°

