spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकयुवासेनेच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटपाचा उपक्रम

युवासेनेच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटपाचा उपक्रम

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त टोका प्रवरासंगम सिद्धेश्वर मंदिर येथे युवासेनेच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

पहाटेपासून मंदिर परिसरात हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध नियोजन करत प्रसादाचे वाटप केले. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना गरमागरम खिचडी देण्यात आली. उपक्रमामुळे दिवसभर मंदिर परिसरात सेवा आणि सहकार्याची भावना दिसून आली.


या वेळी युवासेनेचे नेते शुभम उगले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक दीपक आगळे, राहुल लकारे, काका खंडागळे, चंद्रकांत गायकवाड, संकेत क्षीरसागर, गंगा रासने, गजानन गरवारे, किरण भालेराव, योगेश पांडव, दीपक आव्हाळे, चंद्रकांत नरोडे, सतीश गांगुले, विलास चव्हाण, अतुल गोरे व रविराज फाजगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

. सर्वांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवत व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने समाजसेवेचा संदेश देत, भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
29.4 ° C
29.4 °
29.4 °
29 %
3.2kmh
62 %
Thu
29 °
Fri
37 °
Sat
36 °
Sun
36 °
Mon
35 °

Most Popular

error: Content is protected !!