spot_img
spot_img
Homeअध्यात्मिक43 जैन धर्मगुरूंचे नेवासात आगमन

43 जैन धर्मगुरूंचे नेवासात आगमन

जैन समाजासाठी अत्यंत मंगलमय असा सोहळा पार पडणार असून सुरीश्वरजी महाराज हे 43 गुरु आणि साध्वी बरोबर येत आहे.

नेवासा येथील जैन मंदिर, आराधना भवन येथे या प्रवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे परमपूज्य आचार्य श्री मुनीचंद्र सूरीश्वरजी महाराज साहेब तसेच 43 गुरु वृंद प्रथमच नेवासा नगरीत येत आहेत. त्यामध्ये 36महिला साध्वी आणि 9 गुरु महाराज आहेत

या ऐतिहासिक आगमनामुळे संपूर्ण जैन संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरुदेवांच्या स्वागतासाठी सर्व श्रावकांनी पांढऱ्या वेशभूषेत उपस्थित राहावे, तसेच श्रावक-श्राविकांनी संपूर्ण कुटुंबासह सकाळी लवकर जैन मंदिर परिसरात जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जैन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संत संपूर्ण संघासह श्री मोहनीराज मंगल कार्यालय (पाकशाळा) येथे जाणार आहेत.


सकाळी ८.४५ वाजता गुरुदेवांचे प्रवचन सुरू होणार आहे. प्रथमच नेवासा नगरीत होत असलेल्या या गुरु आगमन आणि प्रवचन सोहळ्यामुळे धार्मिक वातावरण भारावून जाणार असून भाविकांनी या गुरु भक्ती प्रसंगाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
few clouds
25.5 ° C
25.5 °
25.5 °
31 %
1.2kmh
24 %
Wed
35 °
Thu
35 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
34 °

Most Popular

error: Content is protected !!