: नेवासे
येथील ज्ञानेश्वरी लिखाण स्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिरात ज्ञानेश्वर मंदिराचे निर्माण कार्यात मध्ये प्रमुख असलेले गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी दिली
विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण वाचन, दुपारी चार वाजता प्रवचन, सहा वाजता हरिपाठ, सात ते नऊ वाजता कीर्तन व रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत जागर होणार आहे.
सप्ताहात मच्छिंद्र महाराज निकम, गहिनीनाथ महाराज आढाव, दादा महाराज वायसळ, नवनाथ महाराज आगळे, योगेश महाराज पवार, माटेगावकर महाराज, मीराबाई महाराज यांचे प्रवचन, तर कीर्तन महोत्सवात कृष्णा महाराज नवले, आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, खेडलेझुंगे संस्थानचे केशव महाराज जाधव, उध्दव महाराज मंडलिक, संजय महाराज धोंडगे, देविदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन होणार आहे.
रविवार (ता.१२) रोजी देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने सांगता होणार आहे

