आमदार लंघे यांनी नेवासा -पंढरपूर गाडीच्या उद्घाटनासाठी घेतली नव्या बसची टेस्ट राईड
नेवासा
बसआगाराला अजून भरपूर बस मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेवासा आगारात पाच नव्या एस.टी. बस दाखल झाल्या या पाच बसेसचे लोकार्पण आज आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी एसटी डेपो मॅनेजर प्रशांत होले यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले प्रवासी वाहतूक संघटनेचेअध्यक्ष व भाजप नेते अनिल ताके यांनी प्रास्ताविकात त्यांनी या पाच गाड्या मिळवण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांचे सह प्रवासी संघटनेने आणि नेवासा प्रेस क्लब बातम्यांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचेसांगितले तसेच लवकरच अजून पंधरा गाड्या मिळाव्यात आणि देवगड पंढरपूर ही नेवासा तीर्थक्षेत्रासाठी आवश्यक असलेली बस सुरू करून पुन्हा बंद करू नये अशी मागणी केली
आमदार विठ्ठलराव लंघे पुढे म्हणाले की स्वर्गीय अण्णा देखील एसटीने प्रवास करीत होते ग्रामीण भागात लाल परी ही एकमेव दळणवळणाचे साधन आहे नेवासा डेपोच्या उभारणीमध्ये आमदारांचे वडील कैलासवासी आमदार वकीलराव लंघे यांचे आणि तत्कालीन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकरराव देशपांडे रामभाऊ पठाडे कैलास शिंदे अशोक डहाळे कै नारायणराव पतंगे यांचे योगदान होते डेपोसाठी नवीन गाड्या आणि कमी असलेला स्टाफ मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले
याप्रसंगी प्रमुख पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे ,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे, अंकुश काळे, ज्ञानेश्वर पेचे, राजेंद्र मते प्रताप चिंधे मनोज पारखे निरंजन डहाळे, भाऊसाहेब वाघ, आदिनाथ पटारे, डॉ. करण सिंग घुले,अशोक करडक,आदि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभारही मानले

चौकट- आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उद्घाटन करताना नवी बस चालवून घेतली टेस्ट राईड-–पाच नवीन गाड्यांचे लोकार्पण झाल्यानंतर नेवासा पंढरपूर बोर्ड लावलेली अनेक दिवसापासून भाविकांची मागणी असलेली बस स्वतः आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सुमारे वीस फूट चालवून तिचे उद्घाटन केले यावेळी बस मध्ये पंचगंगाचे प्रभाकरराव शिंदे यांचे सह सर्वच सेना भाजपचे कार्यकर्त बस मध्ये बसलेले होते आमदारांच्या यशस्वी राईड नंतर उपस्थितानी टाळ्या वाजवल्या