पंचविसावा बालगंधर्व पुरस्कृत पुरस्कार सोहळ्यात झाला सन्मान
नेवासे
साईदिशा प्रतिष्ठान व आयटीएसएफ तर्फे दिला जाणारा ‘सेवारत्न’ पुरस्कार अपर जिल्हाधिकारी व महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी स्वीकारला. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या २५ व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, कुमार शानू, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय सेवेसोबतच श्रीमती भिकाने यांनी प्राणीसंवर्धन, गोरक्षा आणि पर्यावरण संरक्षण उपक्रमात मोलाचे काम केले आहे. भटक्या प्राण्यांची देखभाल, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पुढाकार घेतला. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत निर्णय अधिकारी म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. सांगलीतील रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार आणि वृक्षलागवड मोहिमेतही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

