spot_img
spot_img
Homeप्रशासननेवासा नगरपंचायत वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करणार व जन्म-मृत्यू दाखले घरपोच देणार...

नेवासा नगरपंचायत वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करणार व जन्म-मृत्यू दाखले घरपोच देणार – नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले


नेवासा : प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान, लोकशाही मूल्ये तसेच नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस असून लोकशाहीमध्ये सेवा, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे, असे प्रतिपादन नेवासा नगरपंचायतीचे नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी केले. ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.

नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर हे प्रथम पहिलेच ध्वजारोहण होते त्यामुळे यावेळी उपनगराध्यक्ष सौ शालिनी सखदान यांच्यासह सर्व नगरसेवक आणि गावातील प्रतिष्ठित मोठ्या संख्येने उपस्थित होते


नगराध्यक्ष डॉ. घुले म्हणाले की, लोकाभिमुख, कार्यक्षम आणि उत्तरदायी प्रशासन देण्याचा ठाम संकल्प नगरपंचायतीने केला आहे. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत लवकरच नगरपंचायत कार्यालयात वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून प्राथमिक आरोग्य मार्गदर्शन, शासकीय आरोग्य योजनांची माहिती व आपत्कालीन समन्वय साधण्यात येणार आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जन्म व मृत्यू नोंदणीचे दाखले घरपोच देण्याची सुविधा सुरू करण्यात येणार असून ही सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक असेल, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत कचरा व्यवस्थापन, नियमित साफसफाई व सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक घरापर्यंत नियमित, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच रस्ते, गटारे, सार्वजनिक सुविधा, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी आवश्यक सोयी, डिजिटल सेवा आणि तत्पर प्रशासन यावर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगून नेवासा नगरपंचायत ही सेवेचे व विश्वासाचे केंद्र बनवण्याचे ध्येय असल्याचे डॉ. घुले यांनी नमूद केले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!