
नेवासा (प्रतिनिधी) : देशाच्या एकता, अखंडता आणि सामंजस्याचा संदेश देत नेवासा शहरात आज “राष्ट्रीय एकात्मता दौड” उत्साहात पार पडली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दल व नेवासा पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडचे आयोजन करण्यात आले.
या दौडचे नेतृत्व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “हम सब एक हैं”, “जय जवान जय किसान” अशा घोषणा देत हातात तिरंगा घेऊन दौड करणाऱ्या युवक-नागरिकांनी नेवासाच्या रस्त्यांवर देशभक्तीची ऊर्जा निर्माण केली. श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकातून निघालेल्या दौडचा समारोप नेवासा न्यायालय प्रांगणात झाला.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले, “देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी अनेक संस्थाने एकत्र आणून भारताची अखंडता घडवली. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय एकतेसाठी योगदान दिले पाहिजे.”
समारोप प्रसंगी न्यायाधीश सुनील भोसले, न्यायाधीश विलास मोरे, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, बाजार समिती सभापती नंदकुमार पाटील, जनसेवक संजय सुखदान, भाजप युवा मोर्चा राज्य सचिव निरंजन डहाळे, बार असोसिएशन अध्यक्ष अँड. अजय रिंधे, सौ. अमृताताई नळकांडे, डॉ. करणसिंह घुले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देत सर्व नागरिकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कोलते, अँड. लक्ष्मण घावटे, अँड. सुदामराव ठुबे, डॉ. भाऊसाहेब घुले, डॉ. विष्णूकांत देवरे, किशोर गारुळे, असिफ पठाण, संभाजी निकाळजे, दिलीप जगदाळे, इम्रान दारूवाले, प्रेस क्लब अध्यक्ष मोहन गायकवाड, मनोज पारखे, अँड. जानकीराम डौले, डॉ. वरुणराज देवरे, अंबादास इरले, शशिकांत नळकांडे, रामनाथ जाधव, जालिंदर गवळी, पांडुरंग मते, अजित नरुला, असिफ शेख, अण्णासाहेब शिंदे आदींसह पोलीस अधिकारी, पोलीस बांधव, महिला पोलीस, होमगार्ड दल, मॉर्निंग वॉक ग्रुप व विविध सामाजिक संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस क्लब कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. करणसिंह घुले यांनी केले.

