spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedअधिक व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता नागेबाबा पतसंस्थेत सुरक्षित गुंतवणूक करावी.- कडूभाऊ...

अधिक व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता नागेबाबा पतसंस्थेत सुरक्षित गुंतवणूक करावी.- कडूभाऊ काळे

नागेबाबा पतसंस्थेच्या कुकाणा शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

नेवासा

तालुक्यातील कुकाणा येथे नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ७२व्या अद्ययावत शाखेचे उद्घाटन सोमवार, १४ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

नागेबाबा पतसंस्था विविध सामाजिक उपक्रमांत नेहमीच आघाडीवर राहिली आहे. पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे चालवली जाणारी गोशाळा, अहिल्यानगर येथील रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी दररोज मोफत दिले जाणारे सुमारे ६०० जेवणाचे डबे, तसेच नागेबाबा सभासद सुरक्षा योजना या माध्यमातून आतापर्यंत २३५ सभासदांना सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी नागरिकांना “पैशांची गुंतवणूक ही कवड्यांचा खेळ नाही, त्यामुळे अधिक व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता नागेबाबा पतसंस्थेत सुरक्षित गुंतवणूक करावी. आम्ही अविरत सेवा देण्यास कटिबद्ध आहोत,” असे आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असिस्टंट सीईओ अक्षय काळे, रीजनल ऑफिसर यशवंत मिसाळ, पोपट जमदाडे, विकास अधिकारी कन्हैया काळे, शाखा व्यवस्थापक दिलदार शेख, मोहन वाघडकर, शाखा अधिकारी सुभाष उमाप यांनी विशेष मेहनत घेतली.

उद्घाटनप्रसंगी सोपान घोडेचोर, ललित भंडारी, विष्णू पवार, दत्तुभाऊ काळे, अशोक वायकर, आबासाहेब काळे, संतोष फुलारी, राजेंद्र चिंधे, डॉ. शिवाजी शिंदे, बबन पिसोटे, भानुदास कावरे, रामनाथ गरड, योगेश वर्मा, डॉ. पांडुरंग कुलकर्णी, डॉ. गणेश आर्ले, हनीफ शहा, मुसाभाई शेख, नबाब शहा, अशोक दरोडे, अभयशेठ बलाई, सुभाष चौधरी, गणेश गव्हाणे, अशोक चौधरी, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, सोमनाथ कचरे, गणेश पवार, शरद गोल्हार, संदीप रिंधे, सुभाष आवटी, अशोक मिसाळ, सुनील कचरे, किशोर फासे, प्रा. नारायण म्हस्के, प्रा. संदीप फुलारी, राजेश वावरे, ॲड. प्रकाश भागवत आदींसह परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
17.9 ° C
17.9 °
17.9 °
37 %
2.6kmh
0 %
Sun
17 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!