spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedअहिल्यानगर ते नेवासाफाटा दरम्यान अनधिकृत बस थांब्यावर लालपरीघ्या प्रवाशांची लूट

अहिल्यानगर ते नेवासाफाटा दरम्यान अनधिकृत बस थांब्यावर लालपरीघ्या प्रवाशांची लूट


सोनई ( अशोक भुसारी यांच्याकडून )

नेवासा
गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बस एस टी महामंडळाची कुठलीही अधिकृत परवानगी नसताना बस खाजगी ढाब्यावर जेवणासाठी थांबतात ज्या ढाब्यावर जेवणासाठी थांबतात तो ढाबा अधिकृत आहे का नाही याचा काही ताळमेळ लागत नाही बस चालक वाहक यांना संबंधीत आगाराकडुन कोणतीही लेखी सुचना नसताना चालक वाहक बिनधास्त पणे बस जेवणासाठी थांबवतात याचा गैरफायदा ढाबा चालक घेतात संभाजी नगर ते अहिल्या नगर महामार्गावर वडाळ्याजवळ ढाब्यावर जळगाव दौंड भुसावळ आणि आणखी लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात या ढाब्यावर. सामोसा वडापाव तीस रुपयास मिळतो त्याची बाहेर कोणत्याही हाटेल मध्ये दहा ते पंधरा रुपयाला मिळतो आहे मग येथेच तीस रुपये घेतले जातात तर भेळ पन्नास रूपये तर चहा वीस रुपयांत मिळतो ही प्रवाशांची लूट नाही का वेळ प्रसंगी हॉटेल मालक व प्रवाशांमध्ये हमरी तुमरीचे प्रकार घडले आहेत मुळात ज्या ठिकाणी या बसेस थांबतात तो ढाबा महामंडळाने अधिकृत परवानगी दिली आहे का मग बस थांबतात कशा संबंधीत बस वाहकाला विचारले असता आम्हाला आगाराकडुन या थांब्यावर थांबण्या विषयी कोणतीही लेखी सुचेना नाही पण इतर बस थांबतात म्हणून आम्ही थांबतो असे थातुरमातुर उत्तर मिळाले प्रश्न असा पडतो ढाबा अधिकृत नाही बस आगाराच्या कोणत्याही सुचना नाही मग अशा प्रकारे प्रवाशांची लुट होतच रहाणार का असा सवाल प्रवासी वर्गामध्ये उपस्थित केला जात आहे नेवासा येथून या बस मध्ये बसलेला प्रवासी आपल्या इच्छित स्थळी वेळेवर पोहचत नाही या बस एक तास या ठिकाणी थांबतात या बस मध्ये बसुन प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागतो बस चालक व वाहकाच्या मनमानीमुळे पुढील प्रवास करण्यासाठी या प्रवाशाला अडचण निर्माण होते त्यामुळे एसटी परिवहन महामंडळाने या हॉटेलवर प्रवाशांची लुट होत असताना येथे थांबण्यासाठी नेमके कोणाचा आदेश आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे
चौकट
एका बस वाहकाने माझे नाव येवू देवू नका या अटीवर कबुल केले की
आमचेच अधिकारी यात गुंतलेले आहेत अगदी खालपासून वर पर्यंत साखळी आहे त्यामुळे काही फरक पडत
मुळात ज्या अधिकृत ढाब्यावर जेवणासाठी बस थांबतात तेथे तिस रुपयाला चहा पोहे किंवा वडापाव किंवा उपमा देण्यात यावा अशा सुचना असताना अशा प्रकारे लुट होतेय याकडे परीवहन खात लक्ष देईल का

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
15.5 ° C
15.5 °
15.5 °
47 %
2.8kmh
2 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °
Fri
30 °

Most Popular

error: Content is protected !!