शिव पाणंद रस्ता चळवळ मुळे मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेस पुनर्जिवन होत असल्याने शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीसोबतच मजबुतीकरणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवणार- शरद भाऊ पवळे (चळवळ अध्यक्ष व प्रणेते)
नेवासा दर्शन:- प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील ९८२२५०३३४२
नेवासा
तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत “मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पानंद रस्ते योजना २०२५-२६” नेवासा तालुक्यात तब्बल ४५ शेत/पानंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष
श्री नाथाभाऊ शिंदे यांनी यांनी दिली.
नेवासा तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात उत्पादित होणारा शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचविण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी तालुक्यातील शेतपानंद रस्ते व्हावे यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे मार्फत पाठपुरावा करून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यामध्ये नेवासा तालुक्यातील २१५ रस्त्यांपैकी ४५ शेतपानंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते सहमती प्रदान कामांची यादी:= नेवासा तालुका जिल्हा अहिल्यानगर
१. किशोर तनपुरे वस्ती ते गुप्ताई रोड खडीकरण करणे भालगाव अंतर १कि. मीटर
२. शिंगवे तुकाई येथील राजेगाव रस्त्या पासून ते मधला घोडेगाव रस्त्यापर्यंत शिव रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे एक किलोमीटर
३. शिंगवे तुकाई फाटा गणपती मंदिर ते वांजोळी रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व मुरमीकरण
४. मौजे चांदा गहिनीनाथ शिवपानंद रोड भराव व खडीकरण करणे
५. मौजे गोदेगाव ते भालगाव रस्ता खडीकरण करणे ६. मौजे धनगरवाडी ते पिंपरी मधील रोड पासून पाचवे वस्ती सोलट वस्तीपर्यंत खडीकरण करणे ७. मौजे गिडेगाव येथील मायनर शेवगा चारी मार्गे गणेशराव शेटे वस्तीपर्यंत खडीकरण करणे
८. मौजे उस्थळ दुमाला येथे पोपट शिंदे घर ते गायकवाड वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण करणे
९. मौजे निपाणी निमगाव येथे उस्थळ दुमाला रोड ते रामनाथ गायकवाड वस्ती रस्ता खडीकरण करणे
१०. मौजे हंडी निमगाव साळुंखे वस्ती ते उस्थळ रस्ता खडीकरण करणे
११. मौजे बाभुळवेढा येथे नगर हायवे ते टिकल वस्ती रस्ता खडीकरण करणे
१२ मौजे गोणेगाव दत्त मंदिर रोडे वस्ती खडीकरण करणे१३. मौजे बेलेकर वाडी बेलेकर वाडी रोड ते ढाले वस्ती मार्गे जिल्हा परिषद शाळा कन्हेर वस्ती खडीकरण करणे
१४. मौजे गणेश वाडी ते कपाळे वस्ती रस्ता खडीकरण करणे
१५. नवे भालगाव ते जुने भालगाव रामेश्वर मंदिर रस्ता खडीकरण करणे
१६. मौजे लोहोगाव ते धनगरवाडी रस्ता खडीकरण करणे
१७ मौजे गोपाळपूर वाकडी रस्ता ते कडू बाळ गायकवाड वस्ती रस्ता खडीकरण करणे
१८. मौजे तेलकुडगाव ते निंबे नांदूर मजबुतीकरण व खडीकरण करणे
१९. मौजे उस्थळ नारायणवाडी ते हिमटाई माता मंदिर रस्ता खडीकरण करणे
२०. मौजे कवठा येथील मुळा कॅनॉल ते शिव चिदंबर मंदिरापर्यंत रस्ता खडीकरण करणे
२१. मौजे जळके खुर्द ते जळके बुद्रुक रोड मेजर मेजर शिंदे वस्ती मार्गे माळजाई मंदिरापर्यंत रस्ता खडीकरण करणे
२२. मौजे पिंपरी शाली रांजणी रोड ते बाळासाहेब नवथर वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण करणे
२३. मौजे तामसवाडी खरवंडी रस्ता खडीकरण करणे २४. चिलेखनवाडी कुकाना शेवगाव रोड मधील सावंत वस्ती पर्यंत रस्ता करणे
२५. माळी चिंचोरा नवीन गावठाण लाखेफळ ते पांढरी वस्ती शाळा पर्यंत रस्ता करणे २६. बऱ्हाणपूर सांगवी शिवरस्ता नदीच्या कडेने पिंपळगाव रोड कडून भर करणे सी.डी. वर्क करणे
२७. मौजे बेलपांढरी म्हसोबा महाराज मंदिर ते मेन रोड खडीकरण करणे
२८. मौजे शिरसगाव येथील प्रभाकर देशमुख टेलर वस्ती ते रावसाहेब आगळे शेतापर्यंत रस्ता करणे
२९. मौजे सोनई कांगोणी रोड २ नंबर चारी ते महादेव मंदिर जगताप वस्ती खडीकरण करणे
३०. मौजे शिंगणापूर सोनई शिंगणापूर रोड स्टेट बँक ते शंकर बाबा मंदिर पर्यंत खडीकरण करणे
३१. मौजे कुकाना सु. कचरे ते वसंत कचरे वस्ती खडीकरण रस्ता खडीकरण करणे
३२. मौजे चिंचबन गावातील जुना पुनतगाव रस्ता खडीकरण करणे
३३. मौजे शिंगवे तुकाई येथे विधाटे वस्ती ते महादेव मळा खडीकरण करणे
३४. मौजे माळस पिंपळगाव छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर महामार्ग ते बऱ्हाणपूर नदी शिव रस्ता खडीकरण करणे
३५. मौजे पानसवाडी येथील चार नंबर चारी खडीकरण करणे
३६. मौजे नेवासा बुद्रुक नेवासा श्रीरामपूर रोड ते उस्थळ खालसा रस्ता खडीकरण करणे
३७. मौजे अमळनेर येथील बेंद वस्ती धनगर वंजारी वस्ती खडीकरण करणे
३८. मौजे पुणतगाव येथील अशोक हल्ली शेख घर ते आळंदी चौक रस्ता खडीकरण करणे
३९. मौजे रस्तापूर येथे वैरागर वस्ती खडीकरण करणे
४०. मौजे घोगरगाव येथील दिगंबर टेकाळे घर ते फडे वस्ती खडीकरण करणे
४१. मौजे म्हाळसपिंपळगाव उकिरवाडी ते बर्डे वस्ती चारीकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे
४२. मौजे लाखेफळ ते पांढरी वस्ती रस्ता अंगणवाडी पर्यंत रस्ता करणे
४३. टोका गोधेगाव मुख्य रस्ता ते हुडी कडे जाणारा रस्ता खडीकरण करणे
४४. टोका गोधेगाव मुख्य रस्ता ते विष्णू डावखर वस्ती
असे एक किलो मीटर अंतर असणाऱ्या ४४ शेतपानंद रस्त्यांचे मजबुतीकरण आणि खडीकरण केले जाणार आहे
४५. वडाळा -खरवंडी शिवरस्ता खडीकरण केले जाणार आहे
नेवासा तालुक्यातील २१५ शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी रोजगार हमी मंत्री भारत गोगावले याच्याकडे केली होती त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ४ शेतपानंद रस्ते मंजूर केले आहे. उर्वरित रस्ते सुद्धा लवकरच मंजूर होणार आहे या योजनेमुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी वर्गाचा दीर्घ काळचा शेतपानंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणारआहे.
महायुती सरकारने ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्या च्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून या मंजूर रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांचे समवेत लवकरच नेवासा येथे सर्व शेत रस्ता समस्याग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी दिली आहे

