दर 10दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठा विरुद्ध होते अंघोळ आंदोलन….
नेवासा (प्रतिनिधी) :
नेवासा शहरात नागरिकांच्या घशाला थेंबभर पाणी न लागता तहान लागलेली असताना, नगरपंचायत आणि वीज मंडळाच्या ‘धोरणांच्या वाळवंटा’त अडकलेल्या जनतेने अखेर प्रशासनासमोर आंघोळ आंदोलन उभे केले. कृत्रिम पाणीटंचाईच्या जाचातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायतसमोर साबण, टॉवेल घेऊन “आंघोळ करू का?” असा सवाल उपस्थित केला.
नागरिकांच्या या उपरोधिक व संतप्त आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली. एवढेच काय, नेहमीच काना डोळा करणारे अधिकारी यावेळी मात्र घामाघूम झाले. लोकांचा संताप पाहून नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष लांडगे आणि वीज मंडळाचे कार्यकारी उपअभियंता बडवे यांनी तातडीने धाव घेतली आणि आश्वासनाचा पाऊस पाडत आठ दिवसांत पाणी व वीजपुरवठा सुरळीत करू, असे लेखी हमीपत्र दिले.
“वर्षभराची पट्टी वसूल करून अर्ध्या वर्षाचं पाणी देणं, ही नेवासा नगरपंचायतची खासियत झाली आहे,” असा टोला मी नेवासकर संघटनेचे शांताराम गायके यांनी लगावला. तर डॉ. करणसिंह घुले (समर्पण फाउंडेशन) यांनी “सुधारीत पाणी योजना सुरू करा, नाहीतर जनआंदोलनाचा जलप्रलय होईल” असा इशारा दिला.
शहरातील पाणीप्रश्नावर आंदोलन पेटताच विकास चव्हाण, माजी नगरसेवक संदीप बेहळे, आपचे संदीप आलवणे यांच्यासह असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाचा पाण्याऐवजी घाम काढला.

या वेळी अनिल सोनवणे, शिवा राजगिरे, शिवाजी गायकवाड,मनेष चव्हाण, प्रकाश चव्हाण, हारुण जाहागिरदार,नविद शेख,संपत लष्करे, अनंता डहाळे, रौफ सैय्यद राजु कनगरे,आशफाक पठाण, संपत आळपे तसेच महिला यमुनाबाई रेलकर, शोभाताई आलवणे यावेळी उपस्थित होत

