नेवासा │
नेवासा शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये मा. उपनगराध्यक्ष व नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसरात वयोवृद्ध नागरिकांच्या बसण्यासाठी आकर्षक सिमेंट पार्क बेंच बसविण्यात आली. या उपक्रमाचे लोकार्पण प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सुभाष चव्हाण, बाळु चव्हाण, फकिरा चव्हाण, उत्तम वाघमारे आणि दिलीप चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
नंदकुमार पाटील यांनी सदैव शहराच्या विकासासाठी लोकाभिमुख दृष्टी ठेवून काम केले आहे. नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांनी छोट्या-छोट्या सोयीसुविधांकडे लक्ष देत सार्वजनिक ठिकाणे अधिक सुंदर आणि उपयुक्त करण्यावर भर दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठी केलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक जाणिवेचा व संवेदनशील नेतृत्वाचा प्रत्यय देणारा ठरला आहे.
या लोकार्पण सोहळ्यास शांताराम गायके, विकास चव्हाण, सदाशिव चव्हाण, संनी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश चव्हाण, सुनील गायकवाड, मनेष चव्हाण, अरुण चव्हाण, हिरामण गायकवाड, संदिप चव्हाण, विजय चव्हाण, लक्ष्मण नाबदे, सुरेश चव्हाण, बबलु शेख, विनायक जाधव, कोरेकर, विशाल चव्हाण आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार शुभम चव्हाण यांनी मानले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल नंदकुमार पाटील यांचे मन:पूर्वक कौतुक केले असून, “शहरातील प्रत्येक प्रभागात अशाच विकासाच्या झेप घ्याव्यात,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

