नेवासा
शहरातील मानाचा पहिला देवी महोत्सव असलेल्या काशी विश्वेश्वर नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी सचिन देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे
सालाबादप्रमाणे याही वर्षी काशी विश्वेश्वर नवरात्र उत्सवाचे कार्यकर्ते उत्सवात माहूर येथे ज्योत आणण्यासाठी गेले होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात चार दिवसात सर्वच भक्तांनी ज्योत नेवासा येथे आणली व त्यानंतर विधिवत मंत्रोपचारात ज्योत पूजन करण्यात आले

त्याप्रसंगी भक्तांचा उत्साह बघण्यासारखा होता असे उपाध्यक्ष अक्षय दाणे यांनी सांगितले अकरा दिवसाच्या ह्या नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्याचा सर्वच महिला भगिनींनी आनंद घ्यावा सहभाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष अक्षय दाणे यांनी केले आहे
मंदिर परिसरात लहान मुलांसाठी लिंबू चमचा संगीत खुर्ची तर महिलांसाठी सप्तशती पाठ कन्या पूजन पाककला स्पर्धा दांडिया अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे
संध्याकाळी भजन संध्याचा कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट करणार आहे अशी माहिती मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मकरंद देशपांडे यांनी दिली उत्सव व्यवस्थित आणि आनंददायी होण्यासाठी मंडळातील सर्व सदस्य आपापला सहभाग नोंदविता आहे

