राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे आयोजन
कुकाना गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दावेदार अब्दुल शेख यांनी उमेदवारी करावी – कार्यकर्त्यांची मागणी
नेवासा, १३ ऑक्टोबर –
कुकाना गटातील महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते अब्दुल शेख यांनी आगामी निवडणुकीत उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा लवकरच मेळावा
जिल्हा परिषदेसाठी शेख हे आपल्या आई व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हकीमाबी शेख यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी करतात का, की पत्नी तस्मिया शेख यांना उमेदवारी देऊन रणांगणात उतरतात — हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे दरम्यान, पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने पक्षाकडून स्वतः अब्दुल शेख यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा जोरदार आग्रह स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने शेख यांना अधिकृत AB फॉर्म देऊन उमेदवार घोषित केले होते. मात्र महायुतीचे हित आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत विद्यमान आमदार विठ्ठल लंघे पाटील यांच्या पाठीशी उभे राहत “महायुती धर्म” पाळला होता.
या निर्णयामुळे मतदारांमध्ये शेख यांच्याबद्दल आदर आणि सहानुभूती वाढली आहे. सर्व जाती–धर्मातील लोकांसाठी सातत्याने काम करणारे, सामाजिक समरसतेचे प्रतीक असलेले शेख यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.
घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, घरेलू महिला कामगारांच्या हक्कासाठी लढा, तसेच बांधकाम क्षेत्रातील स्थानिक रोजगारनिर्मिती यामुळे शेख यांची “महिलांचा लाडका भाऊ” अशी ओळख निर्माण झाली आहे. रक्षाबंधन कार्यक्रमांमधील भावनिक प्रतिसादाने याला अधिक बळ मिळाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेली शेख यांची जवळीक आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध पाहता, नेवासा तालुक्यात आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार गट कुकानाकड मागणार हे निश्चित

