spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedजन-उत्थान सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनकडून मोफत मार्गदर्शन

जन-उत्थान सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनकडून मोफत मार्गदर्शन


नेवासा

जन-उत्थान सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. विशेषतः गेल्या दोन ते तीन वर्षांत फाउंडेशनने बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करून दोघांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक पुस्तिका तयार केल्या असल्याची माहिती ज्ञानदेव झिंजुर्डे यांनी दिली


या मार्गदर्शिकांमध्ये कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता कशी राखावी, कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अपघात व अडचणी टाळता येऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, विमा व आरोग्य सुविधा कामगारांपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, हा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश राहिला आहे.


सध्या फाउंडेशन पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या ठिकाणी सक्रियपणे कार्यरत असून या सामाजिक उपक्रमासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा इंजिनिअर प्रतिक्षा जाधव, उपाध्यक्षा सारिका भांबुरे यांच्यासह सिव्हिल इंजिनिअर अमोल नगरे, विशाल कराळे व सिव्हिल इंजिनिअर माणिक व्यवहारे हे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!