सलाबतपूर, कुकाणा, देडगाव या गणातून येणार ओबीसी सभापती
नेवासा
: जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदाच्या निघालेल्या आरक्षणानंतर तालुक्यातील सर्वसाधारण गटातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या सात पैकी सहा जागा सर्वसाधारण तर सोनाईची जागा ओबीसी महिला राखीव असे आरक्षणाचे दान पडले आहे. तर पंचायत समितीमध्ये देखील तब्बल आठ ठिकाणी सर्वसाधारण तर ओबीसींच्या तीन जागा राखीव आहेत.
जिल्हा परिषद सात गटात पाच महिला विजय होणार
यामध्ये सलाबतपूर, कुकाणा, देडगाव या गणातून ओबीसी असल्याने भावी पंचायत समिती सभापती निवडला जाणार असल्याने या गनामध्ये मोठी चुरस दिसेल.
आठ वर्षांनी होत असलेल्या ही निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका’सभापती हे ‘मिनी आमदार’ म्हणून ओळखले जातात त्यामुळे या निवडणुकीत महत्त्व आहे
जिल्हा परिषद व पंचायत समिती ही राजकारण्याची दुसरी फळी निर्माण करण्याचे साधन आहे. आपल्या गट-गणाचा विचार करून हे सदस्य आमदारकीसाठी पात्र होतात. नेवासा तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे हे नेतृत्व पुढे आले आहे.
प्रचंड तयारीत असलेले कार्यकर्ते आता पंचायत समिती व जिल्हा परिषदे साठी इच्छुक असताना १६ जागा सर्वसाधारण निघाल्याने नेत्यांचे तिकीटवाटपात हाल होणार आहेत. गेली आठ वर्षे हे कार्यकर्ते फक्त पक्षीय पदाधिकारी म्हणून वावरत असून महायुतीच्या राजकारनात तिकीट वाटपात मध्ये ओढाताण होणार आहे.
मागील निवडणुकीत सोनई गणातून निवडणूक लढवत सुनीता गडाख या सभापती झाल्या होत्या, मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान त्यांनी राजीनामा दिला. या गणात यावेळीही सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले आहे.
कुकाणा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजस्विनी लंघे यांना पुन्हा संधी आहे. खरवंडीमध्ये यावेळी सुनील गडाख याचे जागी महिला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे.
भेंडा जिल्हा परिषद सदस्यपदी आशाताई मुरकुटे यांना संधी मिळेल का अशी चर्चा आहे
पंचायत समिती (एकूण गण १४)
नेवासा पंचायत समिती गण आरक्षण
अनुसूचित जमाती व्यक्ती (बेलपिंपळगाव),
अनुसूचित जाती व्यक्ती (भानसहिवरे),
अनुसूचित जाती महिला (मुकिंदपुर),
नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती ( देडगाव),
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला(सलाबतपूर,कुकाणा),
सर्वसाधारण व्यक्ती (घोडेगाव,चांदा, भेंडा,खरवंडी),
सर्वसाधारण महिला (पाचेगाव,सोनई,शिरसगाव,करजगाव)
जिल्हा परिषद (एकूण गट सात)
सर्वसाधारण महिला
(बेलपिंपळगाव,कुकाणा,खरवंडी,चांदा)
सर्वसाधारण व्यक्ती
(भेंडा,भानसहिवरा)
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
(सोनई)

