spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedजीवनाच्या भावगंगेचा किनारा गाठायचा असेल, तर तत्त्वज्ञानरूपी 'पैस'खांब हाच खरा आधार!" –...

जीवनाच्या भावगंगेचा किनारा गाठायचा असेल, तर तत्त्वज्ञानरूपी ‘पैस’खांब हाच खरा आधार!” – देविदास महाराज म्हस्के

ज्ञानेश्वर मंदिरामध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी!

नेवासा (प्रतिनिधी) – “संसाररूपी प्रवाहातून तरून जायचे असेल, तर ब्रह्मस्वरूप सद्गुरूंचा आधार आवश्यक आहे. देव तुम्हाला ऐश्वर्य देईल, पण जीवनाला दिशा देणारे संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञानच खरे सहाय्य करते. आणि म्हणूनच पैस खांब हे तत्त्वज्ञानाचे जिवंत प्रतीक आहे!” असे प्रभावी विचार देविदास महाराज म्हस्के यांनी गुरुपौर्णिमा कीर्तनात मांडले 

गुरुमाउली संत ज्ञानेश्वरांच्या पावन चरणी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटेच्या वेळी वेदशास्त्रांचे घोष व अध्यात्मिक वातावरणात पवित्र ‘पैस खांब’ आणि माउलींच्या पादुकांचे पूजन व अभिषेक देवदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर गुरुवर्य बन्सी बुवा तांबे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि समाधी मंदिरालाही अभिवादन व पूजा करण्यात आली

जगात अद्वितीय असलेले पसायदान मागणारे ज्ञानेश्वर हेच सर्वश्रेष्ठ सद्गुरु आहेत. पैस खांब म्हणजे ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा दीपस्तंभ! जो जो या तत्त्वदर्शनाला शरण जातो, त्याचे जीवन सार्थ होते. —देविदास महाराज म्हस्के

सकाळी पूजन, आरती, व कीर्तनानंतर दिवसभर हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत होते. परिसर भक्तिरसात न्हालेला होता.

या उत्सवप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त मंडळाचे विश्वस्त विश्वास मामा गडाख माधवराव दरंदले रामभाऊ जगताप माऊली शिंदे भिकाभाऊ जंगले, कृष्णा अण्णा पिसोटे कैलासराव जाधव तसेच व्यवस्थापक भगवानराव सोनवणे ,रवी जमदडे याशिवाय दिवसभरात वारकरी संप्रदायाचे  अंजाबापु कर्डीले, नंदकिशोर महाराज खरात, श्रीहरि महाराज वाकचौरे,गणेश महाराज आरगडे,नवनाथ महाराज आगळे, हरि महाराज भोगे आणि स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट — जगात अद्वितीय असलेले पसायदान मागणारे ज्ञानेश्वर हेच सर्वश्रेष्ठ सद्गुरु आहेत. पैस खांब म्हणजे ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा दीपस्तंभ! जो जो या तत्त्वदर्शनाला शरण जातो, त्याचे जीवन सार्थ होते. —देविदास महाराज म्हस्के

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
17.9 ° C
17.9 °
17.9 °
37 %
2.6kmh
0 %
Sun
17 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!