“बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रमात अध्यक्ष मा.आ.नरेंद्र घुले पाटील यांची घोषणा”कामगार आणि शेतकऱ्यांसा आनंददायी बातमी!
नेवासा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये इतका पहिला ऊस भाव देण्याची घोषणा केली असून, कामगारांना १३ टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याने दोन्ही घटकांसाठी ही दुहेरी आनंदाची बातमी ठरली आहे.
भेंडा येथील कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यात अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी ऊसदर जाहीर केला. या प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. अभंग म्हणाले, “१ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होत असून दररोज ९५०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले जाणार आहे. ऊस तोडणी व वाहतुकीची सुयोग्य व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटेल. १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.”
🔹 कामगार नेते नितिन पवार यांनी सांगितले की, “लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी उभी केलेली ज्ञानेश्वर संस्था ही शेतकरी व कामगारांची खरी ‘कामधेनू’ आहे. नरेंद्र घुले पाटील आणि चंद्रशेखर घुले पाटील हे दोघेही घटकांचे हित जोपासत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपला ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा.”
दरम्यान, अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, संचालक चंद्रशेखर घुले पाटील आणि कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कामगारांना १३ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कारखान्यात आनंदाचे व्यक्त होत आहे.
सोहळ्यात संचालक, अधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

