आतापर्यंत नेवासा तालुक्यात सुमारे तीस हजार बांधकाम कामगारांची नोंद…..
नेवासा
दोन महिन्यात अडीच हजार कामगारांना संच, २३० रुग्णांना आरोग्य योजनेचा लाभ आणि विद्यार्थ्यांना अडीच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.बांधकाम कामगारांच्या न्यायहक्कासाठी मी सदैव आपल्या पाठीशी राहीन असे आश्वासन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिले
येथील समर्पण फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या विविध योजनांअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना लाभांचे वाटप आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील होते. व्यासपीठावर पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक चेअरमन प्रभाकरराव शिंदे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे, अहिल्यानगर येथील सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे, डॉ. बाळासाहेब कोलते, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, भाजप तालुकाध्यक्ष प्रतापदादा चिंधे, भाजप शहराध्यक्ष मनोजभाऊ पारखे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पवार,अदिनाथ पटारे, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सौ. शोभाताई आलवणे, वैद्यकीय विभागाचे सचिन काळे, ज्येष्ठ कामगार डेव्हिड साळवे, देवगड मुरमेचे सरपंच अजय साबळे, प्रतीक शेजुळ, महेश लोखंडे, श्रीकांत बर्वे, किशोर गारुळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष व कामगार नेते डॉ. करणसिंह घुले पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, “सन २०११ पासून समर्पण फाऊंडेशनच्या माध्यमातून असंघटित कामगारांना संघटित करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असून आतापर्यंत नेवासा तालुक्यात सुमारे तीस हजार बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे. कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढा सुरूच राहील.”
प्रभाकरराव शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कामगारांना संघटित करण्यासाठी डॉ. करणसिंह घुले पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आणि निःस्वार्थी कार्य केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी रहा,” असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की, “बांधकाम कामगारांच्या हितासाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. विश्वकर्मा योजनेद्वारे दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचे काम होत असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकार हे कामगार हिताचे पहिलेच सरकार आहे. नेवासा तालुक्यात केवळ दोन महिन्यांत अडीच हजार कामगारांना संच, २३० रुग्णांना आरोग्य योजनेचा लाभ आणि विद्यार्थ्यांना अडीच कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी कोणी व्हीआयपी नाही, तुमच्यातलाच आमदार आहे. हात दाखवा, गाडी थांबवा, काम सांगा — हे माझे कर्तव्यच आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भक्कम साथीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगारांच्या न्यायहक्कासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
मेळाव्यात लाभार्थी कामगारांना आरपीएल प्रमाणपत्र, अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती धनादेश आणि भांड्यांचे संच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
समर्पण फाऊंडेशनचे प्रवक्ते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर पांडुरंग मते यांनी आभार मानले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कामगार नेते कृष्णाभाऊ डहाळे, रंगनाथ डुकरे, पांडुरंग मते, दीपक भोंगळ, अनिल सोनवणे, राम चिकणे, अमोल शेरे, बाबासाहेब दातीर, पप्पू चेमटे, पोपट शेकडे, अमोल परदेशी, एकनाथ गवळी, मोजेस वंजारे, समाधान गुजर, दत्तू भारस्कर, संजय शेलार यांनी विशेष प्रयत्न केले.

