शेतकऱ्यांसाठी ठोस व प्रभावी शेतकरी संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे,”- डॉक्टर अशोकराव ढगे
नेवासा
नाबार्ड व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरासंगम येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील शेतकरी सभासदांना डिजिटल व्यवहारांचे महत्त्व, आधुनिक बँकिंग सुविधा व आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सहकारी बँकेचे प्रवक्ते श्री. मंडलिक व तालुका विकास अधिकारी श्री. खाटीक यांनी बँकिंग व सहकारी सोसायट्यांच्या व्यवहारातील डिजिटल सक्षमीकरणामुळे कारभार वेगवान, कार्यक्षम व पारदर्शक होईल असे प्रतिपादन केले. त्यांनी आर्थिक साक्षरतेमुळे शेतकरी सभासदांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल, असेही नमूद केले.
कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी नवयुगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॅटेलाईट टेक्नॉलॉजी, बिग डेटा प्रोसेसिंग यांचा शेतीतील उपयोग स्पष्ट करून “शेतकऱ्यांसाठी ठोस व प्रभावी शेतकरी संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे,” अशी मागणी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन पांडुरंगदादा काळे होते. यावेळी माजी सरपंच वसंतराव डावकर, सोसायटीचे संचालक पोपटराव कदम, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, माजी व्हाईस चेअरमन प्रकाश पांडव, आरएसएसचे सक्रिय नेते दत्तात्रेय गुरुकुल, पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव मते, खडका व मंगळापूर सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मंगळापूर सरपंच पोपटराव गव्हाणे, बँकेचे मॅनेजर शेजुळ, कर्मचारी आर. ए. कारले, व्ही. बी. सुडके, एन. पी. जाधव, ग्रामपंचायत सरपंच संदीपराव सुडके, भाऊराव ढगे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात क्यूआर कोड, केवायसी, परदेश शिक्षण कर्ज, सोनेतारण योजना, खात्यांचे संगणीकरण, वारसदार नेमणूक पद्धत, पीक कर्ज व आरटीजीएस प्रणाली यासंबंधी माहिती देण्यात आली.
चौकट—, नाबार्ड आयोजित या कार्यक्रमाला नाबार्डचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. .

