नेवासा,
आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा शहरात महाआरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील खरवंडी गावचे रहिवासी असलेले अजित फाटके हे प्रसिद्ध यशस्वी उद्योजक आहेत व आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यभार संबंधित आहेत हे शिबिर सोमवार, दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत नगरपंचायत चौक, बाजारतळ, नेवासा खुर्द येथे पार पडणार आहे. या उपक्रमासाठी घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
शिबिरात एसएमबीटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांवरील तपासणी व उपचार केले जाणार असून, ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर, रुग्णालयात जाण्याचा प्रवासखर्च आयोजकांकडून मोफत केला जाणार आहे. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयातील भोजनाची व्यवस्था देखील नि:शुल्क करण्यात आली आहे.
या शिबिरात हृदयरोग, मेंदूचे विकार, नेत्ररोग, दंतविकार, स्त्रीरोग, बालरोग, हर्निया, मुतखडा, मुळव्याध, पोटाचे आजार तसेच हाडांचे विकार अशा संपूर्ण आजारांवर उपचार आणि आवश्यक तेथे शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आम आदमी पार्टी नेवासा तालुकाध्यक्ष ॲड. सादिक शिलेदार, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, संदीप आलवणे, प्रवीण तिरोडकर, करीमभाई सय्यद, किरण भालेराव, देवराम सरोदे, सलीमभाई सय्यद, विठ्ठल मैंदाड, मुन्ना आतार, अण्णा लोंढे, बाळासाहेब साळवे, कुणाल मांडन, शेखर म्हस्के व राहुल फाटके आदींनी एकत्रित आवाहन करताना सांगितले की – “हा उपक्रम हा केवळ आरोग्य सेवा नसून समाजातील दुर्बल घटकांना बळ देणारा सामाजिक उपक्रम आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.”

