नेवासा दर्शन:- प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील ९८२२५०३३४२
नेवासे
: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहिवाट, शेत रस्ते खुले करण्याच्या अभियानासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिवानंद रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद भाऊ पवळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष रस्तेमोजणीचा प्रारंभ चिलेखनवाडी येथून प्रत्यक्ष नकाशावरील रस्ता मोजणी करून नुकताच झाला. शुक्रवारी कुकाणा – चिलेखनवाडी जुना रस्ता मोजणीसाठी सुरुवात झाली आहे.
यावेळी मोजणी मंडळाधिकारी तृप्ती साळवे, भुकर मापक राहुल शिरसाट, सरपंच भाऊसाहेब सावंत, राज्य शेत व शिव पाणंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, चळवळीचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात, कानिफनाथ कदम, अनिल गर्जे, विलास
देशमुख, योगेश वर्मा, उपसरपंच नाथाभाऊ गुंजाळ, अर्जुन पंडित, प्रशांत कांबळे, डॉ. अनिल गायकवाड, राहुल जावळे, श्याम सरोदे, सुनील गायकवाड,आदिनाथ लोखंडे, गोरख गुंजाळ, नवनाथ पवार, मुसा इनामदार, गणेश पवार, सोमनाथ पवार, नवनाथ पवार, तलाठी क्षिरसागर आदी उपस्थित होते
. चिलेखनवाडी हे गाव हे पहिले रोड मॉडेल व्हिलेज ठरले असून भूमि अभिलेखचे उपअधिक्षक संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानास सुरुवात झाली आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त व मोजणी शुल्क शासनाने माफ केलेले असून रस्ते मोजणी झाल्यानंतर लावलेले दगड काढले तर गुन्हाही नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची यशस्वी सुरुवात चिलेखनवाडी रस्ता मोजणी करून झाली आहे पोलीस बंदोबस्त नसतांनाही
लगतच्या सर्व शेतकऱ्यांनी यावेळी मोजणीला सहकार्य केले. ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला असून भूमि अभिलेख, महसूल यंत्रणेचे सहकार्य लाभले.

