spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाची गटनोंदणी जितेंद्र कुर्हे यांची गटनेतेपदी निवड

नेवासा नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाची गटनोंदणी जितेंद्र कुर्हे यांची गटनेतेपदी निवड


नेवासा : नेवासा नगरपंचायतीमध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाची अधिकृत गटनोंदणी पूर्ण केली असून गटनेतेपदी जितेंद्र कुर्हे यांची निवड करण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे डॉ. करणसिंह घुले यांची निवड झाली असली, तरी नगरसेवकांमध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्ष व मित्रपक्ष आम आदमी पार्टीच्या युतीचे दहा नगरसेवक निवडून आल्याने या गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याशिवाय शिवसेना चार, भाजप दोन तर एक अपक्ष नगरसेवक असा पक्षीय बलाबल आहे.


गटनोंदणीपूर्वी क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सोनई येथे जाऊन माजी मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. त्यानंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


यावेळी सर्वानुमते जितेंद्र कुर्हे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. मागील पंचवार्षिक काळात त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या. त्यामुळे नगरपंचायतीतील कामकाजाचा अनुभव, तसेच पक्षाशी असलेली एकनिष्ठा लक्षात घेऊन माजी मंत्री गडाख यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत गटनेतेपदाची जबाबदारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
24 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!