राजकीय पातळीवर एकच खळबळ:
“निवडणूक जवळ समजत असतानाच… पुन्हा शून्यापासून सुरुवात!”
नेवासा – निवडणूक आयोगाने मध्यरात्री नंतर अचानक वेबसाइटवर टाकलेल्या निर्णयाने नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड उलथापालथ झाली आहे.
ज्या निवडणुकांमध्ये न्यायालयीन वाद झालेले आहेत व या वादांचे निकाल २३ तारखेनंतर लागलेल्या सर्व ठिकाणांचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्याचा धक्कादायक निर्णय आयोगाने घेतला आहे.
नेवास्यात नगराध्यक्ष पदासह चार प्रभागांतील निवडणुका न्यायालयात प्रलंबित होत्या. हे सर्व अपिले न्यायालयाने फेटाळली परंतु
आता मतदान 20 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता
हे निकाल २३ तारखेनंतर लागल्याने नेवासानगरपंचायत ही थेट या निर्णयाच्या कक्षेत आली आहे. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे.

