spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा येथील महाआरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा येथील महाआरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

गरिबांसाठी आरोग्यदूत ठरले अजित फाटके – ६५० रुग्णांची मोफत तपासणी, २३० शस्त्रक्रियेसाठी पात्र

नेवासा (प्रतिनिधी) :

नेवास्यातील बाजारतळावर रविवारी वेगळेच दृश्य अनुभवायला मिळाले. कुठे आजारींची काळजी घेणारी डॉक्टरांची सेवा, कुठे सामाजिक बांधिलकीची उर्जा तर कुठे मदतीसाठी धावून आलेल्या कार्यकर्त्यांची तत्परता… या सगळ्यांचा संगम जणू समाजासाठी उभ्या केलेल्या एका मोठ्या आरोग्ययज्ञात झाला होता.

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजितजी फाटके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नवरात्राच्या मंगल मुहूर्तावर आयोजित या महाआरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराने नेवास्यात नवचैतन्य फुलवले. तब्बल ६५० रुग्णांची मोफत तपासणी तर २३० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने असंख्य कुटुंबांना दिलासा मिळाला

उदघाटन प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजितजी फाटके, राज्य सचिव अभिजित मोरे, सुदर्शन जगदाळे, आदमी पार्टीचे राज्य सचिव सुभाष केकाण, संतोष नवलखा, समर्पणचे डॉक्टर करण घुले दिनकरराव गर्जे, प्रशांत कांबळे, राष्ट्रवादीचे गफूरभाई बागवान, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, आधी सर्व पक्षांचे नेते व मान्यवर उपस्थित होते. पक्षभेद बाजूला ठेवून आरोग्याच्या सेवेत सर्व समाज एकत्र आला, हेच या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले.

Oplus_131072

“मी वाढदिवस कधी साजरा केला नाही, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाने हे शिबिर भरवले. गोरगरीब, वंचित घटकांसाठी सेवा करता आली, हाच माझ्यासाठी खरा आनंद आहे,” अशा शब्दांत अजित फाटके यांनी मनोगत व्यक्त केले. तर आमदार लंघे यांनी “हे कार्य हेच खरे सामाजिक पूजन” असे गौरवोद्गार काढले.

एसएनबीटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, मुतखडा, मुळव्याध अशा अनेक आजारांवर तपासणी करून रुग्णांना नवी उमेद दिली. होमिओपॅथी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगदान दिले.

आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुकाध्यक्ष अॅड.सादिक शिलेदार, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, शहराध्यक्ष संदीप आलवणे, प्रवीण तिरोडकर, करीम सय्यद, कुणाल मांडण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष संदीप आलवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या शिबिरात रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले दिलाशाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. सामाजिक बांधिलकीच्या वाटेवरचा हा आरोग्यदूत ठरलेला दिवस नेवास्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, यात शंका नाही.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
15.5 ° C
15.5 °
15.5 °
47 %
2.8kmh
2 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °
Fri
30 °

Most Popular

error: Content is protected !!