spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासे प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीरअशोक डहाळे,डॉ निलेश लोखंडे,विक्रम गोसावी गुरुजी यांना पुरस्कार...

नेवासे प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीरअशोक डहाळे,डॉ निलेश लोखंडे,विक्रम गोसावी गुरुजी यांना पुरस्कार जाहीर.

नेवासा :

नेवासा प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून बुधवार (दि.७) रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण नेवासा येथे होणार आहे.


पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे,वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असलेले डॉ.निलेश लोखंडे यांना समाजभूषण व तर शिक्षण क्षेत्रातबरोबरच सामाजिक कार्य अग्रेसर असलेले जिल्हा परिषद शिक्षक विक्रम गोसावी यांना सामाजिक कार्य पुरस्कार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली आहे.


नेवासा येथील पंचायत समिती सभागृहात बुधवार दि ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या शुभहस्ते व जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो म्हणूनच तालुक्यातील पत्रकार बांधव व विविध पक्षाचे नेते मंडळी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस क्लबचे संस्थापक गुरूप्रसाद देशपांडे,मार्गदर्शक सुधीर चव्हाण,कैलास शिंदे,अशोक डहाळे,सुहास पठाडे,मकरंद देशपांडे,शंकर नाबदे,रमेश शिंदे,नानासाहेब पवार,शाम मापारी,पवन गरुड अभिषेक गाडेकर यांनी केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!