कर्तृत्वाला मान्यता देणे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू …
कोल्हार( प्रतिनिधी ) :- साईप्रसाद कुंभकर्ण याच कडून
नाशिक शहरात दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पद्माशी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कर्तृत्वाचे शिल्पकार पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सह.संस्था निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे , उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे , जय शंकर प्रतिष्ठानचे (पप्पाजी ) सु.द पुराणिक ,परशुराम हिंदू सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.
संस्थापक व ट्रस्टचे अध्यक्ष मीनल कुलकर्णी यांनी सांगितले की, “कर्तृत्वाला मान्यता देणे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.”
हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर रोजी कुर्तकोटी सभागृह नाशिक येथे सायंकाळी 4 वा. संपन्न होणार असून पुरस्कार सोहळ्याला नाशिकसह राज्यभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहे.

