spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमक्तापूर रस्त्याचे रखडलेले कामा साठी आंदोलन छेडण्याचा इशारा

मक्तापूर रस्त्याचे रखडलेले कामा साठी आंदोलन छेडण्याचा इशारा

नेवासा प्रतिनिधी गणेश झगरे
नेवासा तालुक्यातील मक्तापूर ते म्हसले रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी संतप्त भूमिका मांडली. याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आमदार विठ्ठलराव लंघे सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर तसेच नेवासा येथील नायब तहसीलदार बोरुडे यांना देण्यात आले.


रस्त्याचे काम अचानक बंद पडल्याने ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत असून शाळकरी मुले, रुग्णवाहिका व शेतकऱ्यांची वाहतूक अडचणीत आली आहे. प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने संताप वाढला आहे.
यावेळी सचिन गायकवाड, भानुदास शिरसाट, राहुल जामदार, अविनाश गोरक्षनाथ बर्डे, जोएल साळवे, रितेश साळवे, अनिल साळवे, सूरज हिवाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काम तात्काळ सुरू न झाल्यास २० तारखेला शाळकरी मुलांसह रास्तारोको आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा ठाम इशारा मक्तापूर व म्हसले ग्रामस्थांनी दिला आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
45 %
2.4kmh
63 %
Wed
38 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
36 °
Sun
32 °

Most Popular

error: Content is protected !!