spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विलासराव खर्चे — कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विलासराव खर्चे — कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले हार्दिक अभिनंदन….

नेवासा
देशातील अग्रगण्य आणि संशोधनपर परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कुलगुरू म्हणून नामवंत मृदशास्त्रज्ञ डॉ. विलासराव खर्चे यांची नियुक्ती महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जाहीर केली आहे. उच्च दर्जाच्या संशोधनासाठी आणि मृद विज्ञानातील मूलभूत, प्रायोगिक व शैक्षणिक कार्याच्या भक्कम पायावर ही निवड झाल्याचे मानले जाते.

या नियुक्तीबाबत कृषीशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी डॉ. खर्चे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यापीठाचे शैक्षणिक सामर्थ्य, नव्या जातींची निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिफारसी आणि संशोधनपर कार्य देशभर गाजत असून, त्याचा थेट लाभ शेतकरी, संशोधक आणि कृषी पदवीधरांना होत आहे.

देशभरातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी, संशोधक, प्राध्यापक आणि तज्ज्ञ या विद्यापीठातून पदवीधर झाले असून त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही विद्यापीठाच्या संशोधनाच्या गुणवत्तेला मोठी प्रतिष्ठा लाभली आहे. अशा संस्थेच्या कुलगुरूपदी होणारी नियुक्ती स्वतःमध्ये एक मोठा सन्मान मानली जाते.

डॉ. खर्चे यांच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाच्या संशोधन परंपरेला आणखी बळ मिळेल, असा आशावाद शैक्षणिक व कृषी वैज्ञानिक वर्तुळात व्यक्त केला जात आह

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
25.9 ° C
25.9 °
25.9 °
28 %
2.4kmh
6 %
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °
Fri
37 °

Most Popular

error: Content is protected !!