उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय जी सामंत यांच्या हस्ते साहित्य संमेलनामध्ये देण्यात आला पुरस्कार…
–
नेवासा
– साहित्यविश्वाच्या रंगमंचावर आपल्या लेखनकृतींनी वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या, शब्दांचे गूढ सामर्थ्य उलगडणाऱ्या आणि मराठी भाषेच्या सर्जनशीलतेला नवा आयाम देणाऱ्या सौ. वसुधा ज्ञानेश देशपांडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा सावेडी उपनगर यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य- नाट्य साहित्य संमेलन २०२५ मध्ये साहित्य गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
समारोप प्रसंगी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय जी सावंत यांच्या हस्ते साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार देण्यात आला यावेळी संमेलनाध्यक्षा कु. गौरी देशपांडे, स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव, मराठा विद्या प्रसारक समाजचे अध्यक्ष श्री. विश्वासराव आठरे पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखाचे प्रमुख कार्यवाह श्री. जयंतजी येलूलकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत
सौ. वसुधा देशपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केलेली कामिनी: एक गूढ रहस्य ही रहस्यमय कादंबरी वाचकांच्या हृदयाला भिडली. साहित्यप्रेमींनी तिचे खुलेपणाने कौतुक केले आणि अवघ्या वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कादंबरी पोहोचली. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ साहित्यिक श्री. श्रीपाल सबनीस यांनी त्यांचा “महाराष्ट्रातील पहिली रहस्यमय कादंबरी लेखिका” या शब्दांत गौरव करत साहित्यक्षेत्रात त्यांचे स्थान अधिक उजळवले.
लवकरच सौ. वसुधा देशपांडे यांची दुसरी रहस्यमय कादंबरी वाचकांसमोर येणार — श्री. ज्ञानेश देशपांडे
आज महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांच्या प्रतिभेची अधिकृत दखल घेत साहित्य गौरव पुरस्कार प्रदान केला, . सौ. देशपांडे यांनी म सा प पुणे उपशाखा सावेडीचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी फिरोदिया, प्रमुख कार्यवाह श्री. जयंतजी येलूलकर व श्री. प्रशांतजी देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
राज्यस्तरीय हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने साहित्यप्रेमी, वाचकवर्ग आणि सर्व स्तरातून सौ. वसुधा देशपांडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

