सकाळी नऊ वाजता ग्रामदेवता मोहिनीराज मंदिरात फोडणार नारळ…..
नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५साठी
मा. आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी नंदकुमार लक्ष्मणराव पाटील हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार देखील पक्षाच्या ध्येयधोरणांसह प्रचाराला सज्ज झाले आहेत.
क्रांतिकारी शेतकरी पक्ष पुरस्कृत व आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. शालिनीताई संजय सुखदान यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ व रॅली बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मोहिनिराज मंदिर, नेवासा येथे आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

