भालेराव कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव..
नेवासा
अहिल्यानगर जिल्ह्याला अभिमान ठरलेल्या भालेराव कुटुंबाला कन्या कु. रेणुका प्रशांत भालेराव हिने दिलेल्या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पुण्यातील भारती विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत रेणुकाने उल्लेखनीय गुणवत्तेसह यश मिळवले असून या यशाचा आनंद भालेराव परिवारासह सर्व श्रद्धावान व ग्रामस्थांनी साजरा केला.
श्रीक्षेत्र अमरापूर येथे श्री रेणुका मातेच्या आरतीला उपस्थित असतानाच तिला हा आनंदाचा संदेश मिळाला. देवतेच्या साक्षीने लाभलेले यश हे कुटुंबाच्या अध्यात्मिक परंपरेला साजेसे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कुटुंबीयांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला तर नातेवाईक, मित्रमंडळी व समाजातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
रेणुका या श्रीरेणुका माता देवस्थानच्या भगवतीभक्त मंगलताई भालेराव यांची नात असून, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट संस्थेचे प्रवर्तक व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत (नाना) भालेराव व सौ. जयंती भालेराव यांच्या कन्या आहेत. घराण्याच्या सांस्कृतिक वारशाचा ठसा तिने कथ्थक व अभिनय क्षेत्रात आधीच उमटविला असून ‘माझी रेणुका’ मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे ती सर्वांच्या मनात घर करून आहे.
या अभिमानाच्या क्षणी तारकेश्वर गडाचे महंत शांतीब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री, हनुमान टाकळीचे महंत रमेश आप्पा महाराज, आखेगाव येथील श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के, मनीषा भालेराव, प्राचार्य चंद्रकांत गळगट्टी, प्रा. उपेंद्र गळगट्टी, विष्णुपंत भालेराव, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके, विजयाताई लांडे, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत घुले, जनार्दन लांडे पाटील, डॉ. अरविंद पोटफोडे, डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ. सुहास उरणकर, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवरांनी भालेराव कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला व मनःपूर्वक अभिनंदन केले.

