नवरात्र काळात सुमारे दहा लाख भाविक घेतात रेणुका मातेचे दर्शन
(फोटो
नेवासा दि. २२ ( प्रतिनिधी )
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात सोमवारी विधिवत घटस्थापना करुन शारदीय नवरात्रोत्सवास मोठया उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
येथील घटस्थापनेसाठी काल रविवारी श्री रेणुका परिवारातील ३० भाविकांनी श्री क्षेत्र माहूरगडाहून पायी ज्योत आणली. तालुक्यात आगमन होतांना तीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. अमरापूर पासून देवस्थाना पर्यत बँण्ड पथक लावून जल्लोषात मिरवणुक काढण्यात आली . ज्योत देवस्थानात आल्यानंतर श्री रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत नाना भालेराव पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके माजी नगराध्यक्ष जनाबाई घोडके यांनी पायी ज्योत आणणाऱ्या भाविकांची पाद्य पुजा करून सर्व भाविकांना महावस्त्रे देऊन त्यांना सन्मानित केले .. .

सोमवारी सकाळी श्री रेणुका भक्तांनुरागी डॉ . प्रशांत नाना भालेराव, वेदशास्त्र संपन्न सच्चिदानंद देवा देशपांडे तसेच तुषार देवा व देवस्थानच्या ब्रह्म वृंदानी आई साहेबांना पुण्याहवाचन , मातृका पूजन, महारुद्र अभिषेक व सुवर्णालंकार घालून विधिवत घटस्थापना केली . दरम्यान आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के यांनी. देवस्थानाला भेट देऊन आईसाहेबांचे दर्शन घेतले . त्यानंतर आईसाहेबांना पायसचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. तसेच शतचंडीयागास प्रारंभ करण्यात आला. दुपारनंतर रोज सकाळी साडेअकराला महाआरती, सायंकाळी ४ ला संगीतराजोपचार, साडेसहाला सायान्ह महाआरती, ७ ला श्रींचे स्तुतीवचने, अष्टके व रात्री ८ ला श्रींचा छबीना मिरवणुक असे नियमित कार्यक्रम आहेत .

