जिल्हाधिकारी प्रशासक, तर ११ सदस्यीय समितीच्या हाती कारभाराची सूत्रे
नेवासे
देशभरातील भाविकांचे सर्वाधिक श्रद्धास्थान ठरलेले श्री शनेश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथील मूळ विश्वस्त मंडळ शासनाने बरखास्त केल्यामुळे, आता देवस्थानाचा कारभार थेट सरकारी अखत्यारीत आला आहे.
अहमदनगर जिल्हाधिकारी यांची तात्पुरत्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती २७ सप्टेंबर रोजी त्यांनी पदभार स्विकारला.यानंतर ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी ११ सदस्यीय कार्यकारी समिती स्थापन केली. एक ऑक्टोबर पासून या समितीकडे देवस्थानातील सर्व दैनंदिन कामकाज, वित्तीय कारभार, दानपेटी व्यवस्था, मालमत्ता संरक्षण व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे
.कार्यकारी समिती सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन वर्ग-१), संजय बिराजदार, तहसीलदार नेवासा, संजय लखवाल, गटविकास अधिकारी नेवासा, आशिष शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शनिशिंगणापूर, विनायक पाटील, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा, गणेश खेडकर, लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, राजकुमार पुंड, उपकोषागार अधिकारी नेवासा, राजेंद्र वाकचौरे, नायब तहसीलदार नेवासा, विनायक गोरे, मंडल अधिकारी घोडेगाव, सतीश पवार, तलाठी शनिशिंगणापूर, दादासाहेब बोरुडे, ग्रामसेवक शनिशिंगणापूर. यांची नियुक्ती करण्यात आली आहे
पुढील काळातपुढील नवीन स्थायी विश्वस्त व्यवस्थापन समिती गठित होईपर्यंत ही कार्यकारी समितीच पूर्ण कारभार बघणार आहे. शासनाने पारदर्शकता, शिस्तबद्ध व्यवहार आणि भाविकांच्या सुविधांची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.

