तब्बल ५१ लाखाच्या पुरस्कारांचे सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे हस्ते झाले वितरण …
नेवासे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना आपण सर्व ‘आदराने ‘माऊली ‘ म्हणून संबोधितो .त्या प्रमाणे शांत संय्यमी असलेले, सातत्याने समाज हीत जपण्यास प्राधान्य देणारे, संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे काळजी वाहू कुटुंबप्रमुख असणारे ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रशांत नाना भालेराव यांना “माऊली” ही संज्ञा तंतोतंत लागू पडते ., कारण ते कर्मचाऱ्यांवर आई सारखेच प्रेम करतात. त्याच्या जन्माने आईची कुस धन्य झाली आहे .अशी गुणी मुले व्हावीत . समाजाच्या उन्नती साठी ती हवी आहेत .अशी अपेक्षा व्यक्त करून श्री रेणुका माता मल्टीस्टेट या संस्थेतील सदस्यांस आपले काम करतांना आपली . कर्तबगारी सिद्ध करण्याची, व त्यातून आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी नानांनी सुरु केलेल्या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहे . त्यातून आपणा सर्वाना भरघोस पारितोषिके प्राप्त होवोत . आणि संस्थेची अशीच,’दिनदुनी रात चौगुनी ‘ प्रगती होवो असे शुभाशीर्वाद तारकेश्वर गडाचे महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांनी दिले.
देशातील नऊ राज्यात १४० शाखामधून तब्बल ७२ हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या श्री रेणुकामाता मल्टिउ.स्टेट संस्थेतील उद्दीष्ट पुर्ती करत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी व शाखांचा वार्षिक गुणगौरव सोहळा रविवारी पुणे -संभाजी नगर हायवे वरील श्री रेणुका माता रेस्टॉरंट व रिसॉर्ट मधील भव्य सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विशेष सोहळ्यात तारकेश्वर गडाचे महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री अध्यक्ष पदावरून बोलत होते .
यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे हस्ते आपापल्या कामात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या श्री रेणुका मल्टीस्टेट संस्थे मधील निवड झालेल्यांना तब्बल ५१ लाख रुपयांच्या रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले..
. यावेळी वर्षा उसगावकर म्हणाल्या,श्री रेणुका माता संस्थेच्या कामगिरीचे मनापासून कौतुक., या संस्थेचे कार्य आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा पाहता मला फोर्ड व टाटा सारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांची आठवण झाली. लहान वयातच नानांनी दाखवलेली दूरदृष्टी उल्लेखनिय आहे .प्रत्येक गोष्टीत त्यांचा ‘माऊली’समान आत्मभाव दिसतो. त्यांच्या नेतृत्वामुळेच संस्थेचा कारभार भक्कम पायावर उभा आहे. समाजाची सेवा हा नानांचा स्थायीभाव आहे. ते खऱ्या अर्थाने टास्क मास्टर आहेत. अवॉर्ड म्हणजे आपल्या करिअरचा सार असतो .त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखे आहे . शुन्यातून प्रगती साधत स्वकर्तृत्वाने एका महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तीने आकाशाला गवसणी घातली आहे . शेवटी आपल्या खास लकबी मध्ये ‘ आपका भविष्य उज्वल है। अशा शब्दात त्यानी नानांचा गौरव करत त्यांना सॅलुट ठोकला .

ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के यांनी संस्थेचे कार्य ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी दीपस्तंभ असल्याचे तर रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांना दिलेली ही बक्षिसे प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
…. संस्थेने अशा गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह देण्याची सुरू केलेली प्रथा निश्चित अद्वितीय आहे .संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ . प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून या स्तुत्य उपक्रमाचा पायंडा पडला आहे .
पाथर्डी शाखेचा दबदबा –
. यावर्षीही प्रथम येऊन पाथर्डी शाखेने बाजी मारली .पाथर्डी शाखेने सलग चौथ्या वर्षीही अव्वल स्थानावर मोहर उमटवली . त्याना तीन लाख एक हजार रु .रोख , सन्मानचिन्ह, ‘ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले
तसेच शेवगाव शाखेने दुसरे पारितोषिक पटकावून दोन लारव एक हजार रु रोख, स्मृतिचिन्ह तर तिसगाव शाखेने एक लारव ५्१ हजार रु रोख व स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ असे तिसरे पारितोषिक पटकावले . . याशिवाय अमरापूर शाखेस ९१हजार रु ., संगमनेर शाखेस ७१ हजार, व कर्जत शाखेस ५१ हजार रु .. अशी उत्तेजनार्थ पारितोषीके देण्यात आली त्याचप्रमाणे बहुतेकांना पदोन्नतीची पारितोषिके बहाल केली आहेत .त्यातून त्यांना वार्षिक वेतनवाढीच्या रूपाने दरमहा किमान तीन ते सात हजाराचा कायमचा लाभ होणार आहे .
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, सी न्यूजचे विश्वस्त वसंत झावरे,संस्थेचे सी.ए जिग्नेश मेहता व तृप्ती मेहता, पुरुषोत्तम बजाज, विश्वस्त ॲड. नितीन भालेराव,विष्णुपंत भालेराव, माजी प्राचार्य चंद्रकांत गळगट्टे , प्रा. उपेंद्र गळगट्टे, अभिराम पाटील, गायत्री पाटील,श्रीमंत घुले , संचालक राहुल जोशी, मंगलताई भालेराव, जयंती भालेराव ,मनीषा भालेराव, कुंदा मुळे, मुख्याधिकारी हरिश्चद्रं मोरे प्रशासकीय अधिकारी कार्तिक पुनगुंटीवार, डॉ . अरविंद . पोटफोडे,. अनिल साठे, प्रा जनार्दन लांडे पाटील,, गुरुप्रसाद देशपांडे, महादेव दळे,’ रावसाहेब मरकड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती . विणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले गणेश शेंडगे यांनी आभार मानले

