आमच्या गाडीत कुणासाठी जागा नाही अफवा पसरवु नका: माजी खासदार सुजय विखे .
नेवासे
आमच्या गाडीत आता कुणासाठी ही जागा नाही,असा टोला माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव न घेता लगावत संगमनेरची गाडी रुळावर आणली आता नेवाशाची गाड़ी रुळावर आणायला आलो असल्याचे असे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.
नेवासे येथे महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, उद्योजक प्रभाकरराव शिंदे,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,किसनराव गडाख,रामभाऊ खंडाळे,जेष्ठ नेते शंकरराव लोखंडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व सतरा प्रभागाती नगसेवक उपस्थित होते.प्रारंभी शहरातील खोलेश्र्वर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील,आमदार विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ करणसिंह घुले यांच्या हस्ते करण्यात आला व शहरात प्रचार फेरी रैली काढण्यात आली यावेळी महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती.
नगरपंचायत चौकात झालेल्या सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.करणसिंह घुले यांनी प्रास्ताविक केले.शंकरराव लोखंडे यांनी स्वागत केले.
पुढे बोलताना विखे म्हणाले की नेवासे येथे अनेक प्रश्न आहे.या सगळ्या प्रश्नावर एका दिवसात तोडगा निघेल असे नाही मात्र नेवाशात जिल्ह्याला राजकीय क्षमता देण्याची ताकत आहे. नेवाशाची विकासाची जबाबदारी आमची आहे. तालुक्यात कुणी म्हणतंय आम्ही इकडे जाणार तिकडे जाणार मात्र आमच्या गाडीत आता कुणासाठी ही जागा नाही असा टोला माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव न घेता लगावला.आमच्या गाडीत बसलेले सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे शहराचे भवितव्य आहे. देशात पंतप्रधान,राज्यात मुख्यमंत्री,जिल्ह्यात पालकमंत्री,तालुक्याला आपला आमदार म्हणून महायुतीचं फक्त विकास करू शकते म्हणून महायुतीला निवडून द्या.आम्ही निवडणुकीसाठी जाती धर्माचा सहारा घेत नाही आमची लढाई विकासाची आहे नेवासे शहरात विकास गंगा महायुती च्या रूपाने वाहिल.
यावेळी बोलताना आमदार लंघे म्हणाले की या निवडणुकीत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे स्वप्न आहे. नेवासे ही ऐतिहासिक भूमी असून अनेक वर्षापासून ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांनी नागरिकाच्या तोंडाला पाने पुसली आहे. तेच तेच चेहरे समोर आणून जनतेचा भ्रम निराश केले जात असून ज्या पक्षाला शेंडा बुडुक नाही असा पक्षाला निवडून देवू नये गल्ली ते दिल्ली महायुतीची सत्ता असल्याने आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे.
कोट-
भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.मात्र डॉ.सुजय विखे व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्थीने त्यांनी उमेदवारी मागे घेत महायुतीच्या प्रचारात पारखे सक्रिय झाले.
कोट- मी नेवाशाचा व्हीजिंटिंग डॉ सुजय विखे यांची मिस्कील टिप्पणी.
नगरध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ करणसिंह घुले असताना आज दूसरे डॉ विखे मदतीसाठी आले असे पत्रकारानी विचारले असता नेवाशाला हेच डॉ आहे मात्र एक व्हीजिंटिंग ड़ॉ असतो तसा मी या पुढे दर महिन्याचा व्हीजिंटिंग डॉ असणार आहे असे सांगता हश्या पिकला.

