नेवासा तालुक्यातील विविध शाळांमध्ये उपक्रम राबवला जाणार…
नेवासे
संविधानाची ७५वी वर्षगाठ साजरी करण्याच्या निमित्ताने अनुलोम संस्थेच्या वतीने संविधान जनजागृती उपक्रम राज्यभर राबवला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा येथे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची तोंड ओळख व्हावी, यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
.कार्यक्रमा अंतर्गत अॅड. मयूर वखरे यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, तत्त्वज्ञान, स्वरूप आणि देशातील महत्वाचे घटक सुस्पष्ट भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या सखोल अभ्यास आणि प्रभावी संवादशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि आतुरता वाढीस लागली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अनुलोम संस्थेचे सेवक अविनाश गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले.
उपक्रमाची आखणी, शाळेशी समन्वय आणि स्वयंसेवकांचे मार्गदर्शन अशा सर्व स्तरांवर त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा सामाजिक बांधिलकीने प्रेरित असलेला प्रयत्न कौतुकास पात्र आहे.विद्यार्थ्यांना व्हिडिओ आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे संविधानाबद्दल माहिती देण्यात आली. उपस्थित शालेय प्रशासनाने संपूर्ण सहकार्य केले, याची विशेष नोंद योग्य ठरेल.
संविधानाचे योग्य आकलन आणि त्याबाबतची जागरूकता हा समाजाच्या प्रगतीसाठी अनिवार्य घटक आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.अनुलोम संस्थेचा हा उपक्रम फक्त शालेय विद्यार्थ्यांपुरता सीमित न राहता, समाजात संविधान विषयक जनजागृती वाढविण्यास निश्चितच हातभार लावणारा ठरेल, असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

