उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून कार्याची दाद; “जनतेच्या हक्कासाठी झटणारा नेता”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे राबविण्यात येणाऱ्या “साथ आहे भैय्याची, योजना आपल्या हक्काची” या राज्यव्यापी जनकल्याणकारी अभियानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडले. या कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांच्या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक करण्यात आले.
या अभियानातून नागरिकांना तब्बल ५,००० हून अधिक शासकीय योजना, मोफत आरोग्य कार्ड, तसेच विविध लाभांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. नेवासा विधानसभा स्तरावर या मोहिमेचे नेतृत्व करताना अब्दुल भैय्या शेख यांनी २०,००० नागरिकांना मोफत माहिती संच व कागदपत्र फाईल उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. तसेच १०,००० मोफत आरोग्य कार्ड आणि इतर साहित्याचे वितरण अब्दुल भैय्या शेख सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
“अब्दुल शेख यांचं कार्य जनतेच्या हितासाठीचं आदर्श उदाहरण आहे. अशा कार्यकर्त्यांमुळे पक्षाची ओळख अधिक मजबूत होते. राष्ट्रवादी काँग्रेस सदैव तुमच्या सोबत आहे.”- अजित दादा पवार
कार्यक्रमास प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक, माजी आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, बाळासाहेब नाहाटा, तालुकाध्यक्ष अशोक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अब्दुल शेख यांनी या निमित्ताने नेवासा नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांबाबत इच्छुकांचा अहवाल अजितदादा पवार व सुनील तटकरे यांच्यासमोर सादर केला. त्यांच्या कार्यशैलीबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे नेवासात पुन्हा एकदा “भैय्यांचा जनआधार” ठळकपणे जाणवला.

