spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचे शनिशिंगणापूर मंदिरात सहकुटुंब दर्शन

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचे शनिशिंगणापूर मंदिरात सहकुटुंब दर्शन

सोनई (प्रतिनिधी) – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी शनिवारी सायंकाळी सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे भेट देत उदासी महाराज अभिषेक केला आणि शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवस्थानच्या अतिथीगृहात नेवासाचे आमदार व शिवसेना शिंदे गटाचे नेते विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचा सत्कार केला.

या वेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन देसर्डा, शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील अ‍ॅड. सयाराम बानकर, मराठा महासंघाचे राज्य प्रमुख संभाजी दहातोंडे, हिरालाल जाधव आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री शिरसाठ यांनी देवस्थान परिसराची प्रगती व राबविल्या जाणाऱ्या विविध योजना यांची माहिती घेत समाधान व्यक्त केले. देवस्थानच्या सामाजिक उपक्रमांची माहिती अ‍ॅड. सयाराम बानकर यांनी त्यांना दिली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
17.9 ° C
17.9 °
17.9 °
37 %
2.6kmh
0 %
Sun
17 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!