नेवासा
सावता परिषदेच्या अहिल्यानगर उत्तर विभाग नेवासा शहराध्यक्षपदी ॲड. अर्थेश राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव प्रा. डॉ. राजीव काळे, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रवीक्सण गाडेकर, प्रदेश महासचिव राहुल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ फुलसौंदर, जिल्हा प्रवक्ते मल्हारी आखाडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर पुंड यांच्या हस्ते निवडीचे पत्र ॲड. राऊत यांना प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी अमोल नांगरे, नवनाथ गवळी, अरुण फुलसौंदर, ऋषिकेश कंक, विजय माकोने, सागर घोलप, आशिष राऊत, सनी मारकळी आदी समाजबांधव उपस्थित होते.

