या पुलामुळे नेवासा–वैजापूर दरम्यानचा मार्ग सुलभ होणार असून, या परिसरातील पर्यटन, अध्यात्म आणि औद्योगिक विकासाला नवे बळ मिळेल. नदीकाठच्या घाटांचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटन सुविधांच्या उभारणीसाठीही जलसंपदा विभागाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला
नेवासे
नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा–नेऊरगाव या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या पुलासाठी राज्य सरकारकडून ₹५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो नेवासा, गंगापूर व वैजापूर या तीन तालुक्यांना जोडणारा विकासाचा नवा दुवा ठरणार आहे. तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जोडणारा नेवासा तालुक्यातील गोदावरी दुसरा पूल ठरला आहे

सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, सुरेगाव रस्ता, नेवासा बुद्रुक येथे झालेल्या या सोहळ्यास जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व प्रा. रमेश बोरणारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी भूषवले.
या वेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, “हा पूल माझ्या वडिलांचे स्वप्न होते. या भागात औद्योगिक क्रांती घडवून रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग खुला होईल.” कारण लवकरच गंगापूर तालुक्यामध्ये मोठा औद्योगिक झोन तयार होणार आहे युवकांना रोजगाराचे नवीन अवसर उपलब्ध होतील आणि या भागाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होईल.”ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी पुलासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्षपदावरून बोलताना उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की वारकरी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा पूल एक पवित्र कार्य आहे. हा संकल्प मनाशी बाळगून शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. अखेर राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार झाले.”
कॉन्ट्रॅक्टर श्री. जगताप साहेब यांनी हा पूल “ज्ञानोबारायांच्या सेवेसमान कार्य” असल्याचे सांगत उत्कृष्ट कामगिरीचे आश्वासन दिले.
या प्रसंगी . नितीन दिनकर (भाजप जिल्हाध्यक्ष), श्री. प्रभाकर शिंदे, श्री. अब्दुल शेख, अधीक्षक अभियंता विवेक माळुंदे, श्री. वालतुरे सर, श्री. सुनीलराव वाघ, अंकुशराव काळे, प्रदीप चिंधे, काकासाहेब शिंदे (संचालक, ज्ञानेश्वर साखर कारखाना), बाळासाहेब काळे, बाळासाहेब पवार, प्रा. रमेश शिंदे, नामदेव शिंदे, अॅड. अण्णासाहेब आंबाडे पाटील, नाथाभाऊ शिंदे पाटील, बापूराव बोडके, शिवाजीराव बोडके, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे, केदार शिंदे, प्रशांत शिंदे, किशोर शिंदे, संतोष शिंदे, कानिफनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच नेवासा खुर्द, नेवासा फाटा, नेवासा बुद्रुक, सुरेगाव गंगा, बेलपांढरी, जैनपूर, बेलपिंपळगाव, भालगाव, उस्थळ खालसा, बहीरवाडी, नेऊरगाव, हैबतपूर, वाहेगाव, कानडगाव, बगडी, गाढे पिंपळगाव आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

