युवा नेते सुजय विखे यांच्या हस्ते होणार शुभारंभ
नेवासा –
भाजप सेना युतीच्या नगरपंचायतीचे प्रचाराचा शुभारंभ 25 नोव्हेंबर रोजी सकाळी सर्व ग्रामदेवतांच्या समोर श्रीफळ फोडून करण्यात येणार आहे या नंतर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे

नेवासा नगरपंचायत निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगत आली आहे, तिरंगी लढतीत भाजप–शिवसेना युतीचा प्रचार आणि आघाडी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींचा वेग वाढवला असून, असून प्रत्येक प्रभागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करण सिंह घुले हे स्वतः फिरताना दिसत आहेत त्यांचे प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली असून आता युतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मंगळवार (ता. २५) रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भव्य प्रचार सभा व रॅली होण्यासाठी युतीचे कार्यकर्ते कामाला लागले असून प्रचाराला पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे, उत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उद्योजक प्रभाकर काका शिंदे, भाऊसाहेब वाघ, जानकीराम डौले, प्रताप चिंधे, प्रकाश निपुंगे, बंडू शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे
प्रचारात शुभारंभ फेरीमध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असून. त्यानुसार मंगळवारी खोलेश्वर गणपती मंदिर व ग्रामदैवत मोहिनीराज मंदिर येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत नारळ फोडून युतीचा अधिकृत प्रचार शुभारंभ होणार आहे.
तरी या शुभारंभच्या फेरीत आणि सभेत युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करण सिंह घुले यांनी केला आहे
तोपर्यंत सर्व उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी कायम ठेवाव्यात, असा सूचक सल्ला जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिला. यावेळी आमदार लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी नगराध्यक्षपदाचे उमेदवार करणसिंह घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

