spot_img
spot_img
Homeराजकारणनेवाशात राष्ट्रवादीचा रणसंग्राम! झिरवाळांच्या जाहीर सभेने प्रचाराला धार ....

नेवाशात राष्ट्रवादीचा रणसंग्राम! झिरवाळांच्या जाहीर सभेने प्रचाराला धार ….

दुपारी अकरा वाजता औदुंबर चौकात जाहीर सभा

दुपारी अकरा वाजता औदुंबर चौकात जाहीर सभा

नेवासा

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक भूमिकेत उतरली आहे. गुरुवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता औदुंबर चौक, नेवासा येथे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. नामदार नरहरी झिरवाळ यांच्या जाहीर सांगता सभेने प्रचाराचा कळस गाठला जाणार आहे.

युवा नेते अब्दुल भैया शेख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने नेवाशात स्वतंत्र, तरुण आणि तडफदार पॅनल उभे करून राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सचिन विलासराव कडु यांना उमेदवारी देत पक्षाने “तरुणांच्या हाती सत्ता” हा स्पष्ट संदेश दिला आहे. बहुतेक जागेवर प्रभागांत तरुण उमेदवार उतरवल्याने राष्ट्रवादीचा हा पॅनल निवडणुकीतील सर्वात चर्चेचा आणि आक्रमक मानला जात आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीने प्रचाराचा वेग प्रचंड वाढवत विरोधकांवर थेट हल्लाबोल सुरू केलामाजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व अब्दुल भाई शेख यांनी शेवटच्या टप्पा स्वतः उपस्थित राहून प्रत्येक प्रभागांमध्ये मतदारांशी संवाद साधला नामदार झिरवाळ यांच्या सभेमुळे नेवाशातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
24 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!