गोडाऊन रस्त्याची दुरवस्था व गटारीच्या साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेवर ठोस उपाययोजना करणार
नेवासा – शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर प्रभाग ७ मधून निवडणूक लढविणाऱ्या भारती कृष्णा परदेशी यांनी मतदारांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्नांना हात घातला.
पाणीप्रश्न सर्वप्रथम सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सदाशिव नगर परिसरात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, यावर तातडीने शाश्वत उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विवेकानंद नगर येथील मारुती मंदिर व म्हसोबा मंदिराचे सुशोभीकरण करून धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
तसेच धन्य गोडाऊनजवळील रस्त्याची दुरवस्था व गटारीच्या साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेवर ठोस उपाययोजना करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचे आश्वासन भारती परदेशी यांनी दिले.
नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर करण सिंह घुले यांना संपूर्ण साथ देऊन प्रभाग आपल्या प्रभागासह संपूर्ण गावाचे विकासाला साथ देण्यासाठी सर्वांनी धनुष्यबाणला दोन वेळा मतदान करावे असे आवाहन कृष्णा परदेशी आणि पप्पू शेठ परदेशी यांनी केले आहेत
शब्दांपेक्षा कामाला प्राधान्य देणारी शिवसेना हीच जनतेची खरी ताकद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

