spot_img
spot_img
Homeराजकारणशिव महाराणा प्रताप चौक, नेवासा फाटा येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी;...

शिव महाराणा प्रताप चौक, नेवासा फाटा येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; लवकरच पुतळा बसविण्याचा संकल्प

नेवासाफाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात थोर शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात, साजशृंगाराने व देशभक्तिपर वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस पाटील आदेश साठे व प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक बादल परदेशी , भुमिअभिलेख कार्यालयाचे रगडे साहेब व भिंगारदिवे पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष उर्जा लाभली. नागरिक, व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत त्यांच्या पराक्रमाला अभिवादन केले.

या कार्यक्रमात बोलताना बादल परदेशी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “शिव महाराणा प्रताप चौकात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच या ऐतिहासिक चौकात हे कार्य पूर्णत्वास जाईल.”

तसेच रगडे साहेब यांनी हलदी घाटी युद्धाची महाराणा प्रतापच्या पराक्रमाची आठवण करून दिली, व पोलीस पाटील आदेश साठे यांनी महाराणा प्रताप यांचे जीवनावर प्रकाश टाकून अनेक आठवणींना उजाळा दिला

या घोषणेने उपस्थितांमध्ये उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरल्याबद्दल प्रिन्स शिव महाराणा प्रताप आयोजन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे , प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बादल परदेशी, करणी सेना महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुनील परदेशी,भूमी अभिलेख कार्यालयाचे साहेब श्री रगडे पाटील , महेंद्र नजन,ज्येष्ठ पत्रकार संभाजी पठाडे, दैनिक लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाट, पत्रकार सचिन कुरुंद ,पत्रकार पंडित, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, गणपतराव मोरे, पप्पू परदेशी, सचिन परदेशी, सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, भिंगारदिवे पाटील, राम मगरे ,किरण चव्हाण ,आकाश चव्हाण, राम चांदणे, गवळी पाटील, कराडे पाटील, सह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

*चौकट *

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांचा लवकरच पुतळा शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे उभारणार*

प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटना
संस्थापक
अध्यक्ष बादल परदेशी

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
41.4 ° C
41.4 °
41.4 °
24 %
6kmh
5 %
Mon
41 °
Tue
42 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!