spot_img
spot_img
Homeराज्यसायमन भारस्कर यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

सायमन भारस्कर यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

शिवजयंती निमित्त पुण्यात भव्यदिव्य सन्मान सोहळा


नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथिल साहित्यिक सायमन भारस्कर यांची राज्यस्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


साहित्य क्षेत्रात आणि कलाक्षेत्रात सातत्यपुर्ण काम करणारे सायमन भारस्कर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक राज्यस्तरीय,व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


पुणे येथील स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना आणि महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक “कलावंत दादासाहेब फाळके’ व सह्याद्री रत्न राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
हा भव्यदिव्य सोहळा आचार्य अत्रे सभागृह पिंप्री चिंचवड पुणे येथे होणार असलेची माहिती कार्यक्रमाचे आयोजक गिरीश राजूरकर ,मंगेश कसवे, सिद्धांत शिंदे, राजेंद्र ठोंबरे यांनी दिली

कार्यक्रमाचे उदघाटक खासदार अमोल कोल्हे (शिरुर लोकसभा मतदारसंघ)असून आमदार महेश लांडगे, अभिनेता विजय पाटकर, सुनिल गोडबोले,प्रशांत तपस्वी,भूषण कडू, अनिल नगरकर, काजल शिंदे असे अनेक कलावंत, सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


सायमन भारस्कर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल नेवासा पंचक्रोशीतील कलाप्रेमी, मित्रमंडळ व चाहतेवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
24 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!