नेवासा
: गेवराई (ता.नेवासा) येथे शनिवारी दुपारी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा मृत्यू झाला. नेवासा फाटा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गेवराई येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले
मयूर संतोष शिनगारे (वय १२ वर्षे), पार्थ उध्दव काळे (वय ७ वर्षे) शिनगारे भोळसर आहे हे दोघे आईवडील दुपारी शेतात काम करीत असताना शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

पंधरा दिवसांपूर्वी उध्दव काळे यांच्या शेततळ्याचे काम पूर्ण झाले होते. शेततळ्यात त्यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी भरले होते ते शेतात काम करत होते. मिरच्या तोडणीचे काम करणाऱ्या महिलांना मुलांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत दोन्ही मुले तळ्यात बुडाली ४० फुट खोल शेततळे असल्याने पोहणारांना मुलांना बाहेर काढता आले नाही शेवटी जेसीबी मशीन लावून शेततळे फोडले व मुलांना बाहेर काढून नेवासा फाटा सरकारी रुग्णालयात आणले तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.